Breaking News

देशातील शेतक-यांसाठी दिल्लीतून लढा-राजू शेटटी

औरंगाबाद, दि. 28, सप्टेंबर - देशातील शेतकर्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती स्थापन करण्यात  आली असून देशभरातील सगळया शेतकरी संघटना 20 नोव्हेंबरला रामलीला मैदानावर एकत्र येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी  यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकारांना दिली.या साठीच त्यांचा मराठवाडा दौरा होता.दिल्लीच्या मेळाव्यात 170 शेतकरी संघटना एकत्र येणार असल्याचे त्यांनी  सांगितले.
शेटटी यांनी केंद्र सरकार ,राज्य सरकार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.चंद्रकांत पाटील स्वताच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत असल्याचा आरोप  करून शेतकर्यांना बोगस म्हणणारे चंद्रकांत पाटील यांनी एकदा बोगस म्हणजे काय ते पाटलांनी सांगावे असे अवाहन त्यांनी केले.
मोदी सरकारने शेतकर्यांना दिलेलं आश्‍वासन पाळलं नाही. त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला. असा आरोप त्यांनी केला.आता शेतकर्यांचा लढा देशपातळीवर  लढणार असून 170 संघटणा एकत्र येणार असल्याचे त्यांनी सांगितले.