Breaking News

पिंपरी-चिंचवड फेस्टिवलचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, दि. 02, सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सावानिमित्त यंदापासून सुरु करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड फेस्टिवलचे अभिनेत्री  सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा फेस्टिवल 1, 2 आणि 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पालकमंत्री गिरीश  बापट यांच्या हस्ते फेस्टिवलचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर नितीन काळजे,अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम  चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदी उपस्थित होते. यावेळी  बोलताना बापट म्हणाले, मध्यंतरी हा फेस्टिवल बंद करण्यात आला होता. मात्र हा फेस्टिवल बंद करू नका तो असाच चालू राहिला पाहिजे 
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली की, पिंपरी चिंचवडमध्ये रसिक लोक राहतात. आपण पर्यावरणाशी मैत्री करून उत्सव साजरा करावा असे तिने आवाहन  केले.अशोक हांडे यांचा ’आवाज कि दुनिया’ या कार्यक्रमाने फेस्टिवलला सुरवात झाली. तत्पूर्वी गणेश वंदना, ढोल-ताशा वादनाचा कार्यक्रम झाला. तीन दिवस  चालणार्‍या या फेस्टिवलमध्ये महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात, पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात विविध  सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.