सोवळं बाटविणारे शुद्र हिंदू कसे...?
कुमार कडलग/नाशिक, दि. 12, सप्टेंबर - यथा राजा तथा प्रजा....राज्याचा कारभारी ज्या प्रवृत्तीचा प्रजाही त्याच प्रवृत्तीची निपजते.अगदी सम्राटशाही पासून चालत आलेला हा संकेत एकविसाव्या शतकातील लोकशाहीतही आहे तसाच आहे,फक्त त्याचे स्वरूप बदलते आहे.आज देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित विचारांची सत्ता आहे.या परिस्थितीत या विचारांनी देशात थैमान घातले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको.सत्तापदावर कोण आहेत त्या व्यक्तीला या व्यवस्थेत अजिबात महत्व नसते.तर त्या व्यक्तीवर कुठल्या विचारांची मोहीनी आहे ,किंबहूना त्या व्यक्तीकडून कुठली शक्ती काम करून घेते हे अधिक महत्वाचे ठरते.विचारांची गुलामगीरी सत्तापदस्थ व्यक्ती एक तर उघडपणे त्या विचारांचे समर्थन करते किंवा या विचारांनी राज्यात जो काही उच्छाद मांडला आहे त्याकडे सोयीस्करपणे पाठ फिरवून स्वतःला अन्य कार्यक्रमात व्यस्त ठेवते.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघप्रणित सरकारचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी देशपातळीवर सुरू असलेला उच्छाद दुर्लक्षित करून ते स्वतःला दुसर्या प्रकारात कायम सहभागी ठेऊ पहात आहेत .
1934 मध्ये या देशात पहिला बाँबस्फोट झाला,तो पुण्यात.खरे तर तेंव्हा हिंदू मुस्लीम अशी वैचारीक आणि सामाजिक फाळणी झालेली नव्हती,याचा अर्थ आज गल्लोगल्ली मुस्लीम दहशतवाद्यांचे पेव फुटले ,हिंदू धर्माच्या विरोधात मुस्लीम धर्माने जेहाद पुकारण्यासाठी दहशतवादाचा आधार घेतला असे म्हटले जाते,तो आधार त्या बाँब स्फोटाला नाही.मग हा बाँब स्फोट पुण्यासारख्या शहरात कुणी आणि का घडविला असेल ? या प्रश्नाचे उत्तर चातुःवर्ण समाज व्यवस्था आणि तत्कालीन स्वातंञ चळवळीवर वर्चस्व कुणाचे याचा शोध घेतांना मिळते.
ब्रिटीशांविरूध्द उभा राहीलेला लढा कुणाचे नेतृत्व मान्य करतो हे ठरविण्याची एक सुप्त योजना तत्कालीन जहाल नेत्यांच्या मनात घोळत होती.म.गांधी यांचे नेतृत्व एका बाजूला उभारी घेत असतांना लोकमान्य नेतृत्व चळवळ हातातून जाईल या भितीने अस्वस्थ झाले होते.म.गांधी यांचे नेतृत्व चळवळीने स्वीकारणे याचा अर्थ चळवळीत दीन दलीत अठरापगड बारा बलूतेदार समाजाचा वाटा वाढणार आणि तेल्या तांबोळ्यांच्या वर्चस्वाखाली चळवळ येईल,या विचाराने भयगळीत झालेली मंडळी म.गांधीचा अडसर दुर करण्याच्या प्रयत्नात होती.त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे 1934 चा तो बाँब स्फोट .स्वातंञचळवळीच्या सुदैवाने या दुर्घटनेतून म.गांधी सुखरूप वाचाले.आणि तो बाँब दुसर्याच एका वाहनावर फुटला.त्यानंतर कायदेमंडळात कुणब्यांना तेल्या तांबोळ्यांना स्थान देऊन नांगर धरायचा का...तेलाचे घाणे काढायचे असे वक्तव्यही या प्रवृत्तींच्या ओठावरून घरंगळले.त्यानंतर 1948 मध्ये पाकीस्तान फाळणी आणि पंचावन्न कोटींचा बहाणा करून म.गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या.गांधी हत्येचे कारण पाकची निर्मिती असे सांगितले जात असले तरी ते तितकेसे खरे नाही.गांधी हे 1934 पासूनच वैचारीक दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते.तेंव्हा कुठे होता पाकीस्तान किंवा पंच्चावन्न कोटीचा मुद्दा.?थोडक्यात या प्रवृत्तींनी पुर्वीपासून बारा बलुतेदार अठरापगड बहूजन समाजाला दुय्यम स्थान दिल्याचे उदाहरणं आहेत.
याच महाराष्ट्रात या विचारांच्या पूर्वजांनी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणे, राजांना शूद्र ठरवून नाकारले होते. संत तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडविली होती. क्रांतीज्योति सावित्री माईंना शेण आणि दगड मारले, महात्मा फुले यांना मारेकरी पाठवले, राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले
जेंव्हा जेंव्हा या मंडळींचे अस्तित्व धोक्यात येते,पुरोगामी विचार वरचढ ठरू लागतात तेंव्हा तेंव्हा हिंदू खतरे में ची हाकाटी पिटून बहुजन समाजाची दिशाभूल केली जाते.कर्मकांडाची मोहीनी टाकून त्यांचे ईप्सीत साध्य केले जाते.देवाच्या दारात दलाला बनून सामान्य भोळ्या भक्तीला लुटले जाते.स्वजातीचे संरक्षण करण्यासाठी धर्माचा मुलामा चढवून बहुजनांची ढाल वापरली जाते.प्रत्यक्षात ही मंडळी बहुजनांना आपले मानायला तयार नव्हती आणि आजही तयार होत नाही हे पुण्याच्या प्रकरणाने सिध्द केले आहे.
ज्यांच्यामुळे सोवळ्याला दर्जा मिळाला,किंमत मिळाली त्या समाजाच्या बाईने केलेला स्वयंपाक त्यांच्या सोवळ्याचा धर्म बाटण्यास कारणीभुत ठरत असेल तर ते आणि आपण एका धर्माचे कसे असू शकतील.एक तार त्यांचा धर्म हीहिंदू नाही किंवा आम्हा शुद्रांचा हिंदू धर्माशी कुठलाही संबंध नाही असे ठासून सांगत फारकत घेण्याची वेळ आली आहे.
सांगायचं तात्पर्य हेच की पुण्यात डा.मेधा खोले बाईंनी निर्मला यादव बाईंवर केलेला आरोप ही केवळ एक घटना नसून राज्यधुरीणांच्या मानसिकतेचे प्रतिक आहे.उघड झाली म्हणून या घटनेची वाच्यता होते.एरवी दररोज अशाप्रकारे मानसिक मुस्कटदाबी सोसावी लाखात आहे.म्हणायला देशाचे पंतप्रधान तेल्या तांबोळ्यांचे पुढारी नृरेंद्र मोदी आहेत.प्रत्यक्षात त्यांच्या मनावर कुठल्या विचाराःचा पगडा आहे,हे वेगळे साःगण्याची गरज नाही.त्यांची अवस्थाही या विचारांनी धरलं तर चावतं अन् सोडल तर पळतं अशी करून ठेवली आहे.म्हणून बापूडे देशात घडणार्या घडामोडींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत.देशात सामाजिक पातळीवर कितीही उलथापालथ झाली तरी देशाचा कारभारी म्हणून नरेंद्र मोदी चकार शदही बोलत नाहीत.त्यांचे तोंड एका विशिष्ट विचारांनी बांधून ठेवले आहे.त्यांचाही वापर या शक्तीने केवळ ढाल म्हणून केला आणि सत्ता हस्तगत केली आहे,हा दावा किती वस्तुस्थिती पुरक आहे याची जाणीव 2019 च्या निवडणूकी नृंतर झाल्याशिवाय राहणार नाही.