आता सर्वंंच भोेंदूबाबांना उघडं करा
दि. 12, सप्टेंबर - लोकांच्या असहायतेचा, श्रद्धांचा बाजार मांडून त्यांची लूट करण्यामुळं धर्माकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत होता. संतांची बदनामी होत होती. या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेनं तथाकथित संतांना उघडं पाडण्याची जी भूमिका घेतली, ती स्वागतार्ह आहे. लोकांच्या अडचणी अनेक असतात. त्या सोडविण्यात कधी अपयश येतं, तर कधी यश. काही लोक नैराश्यात जातात. कधी कधी असाध्य आजारानं त्रस्त होतात. वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी असे लोक बाबा, बुवांकडं जातात. त्यांना तात्काळ इलाज हवा असतो. काहींना अपत्यपाप्ती होत नसते. काही कुटुंबातील वेगवेगळ्या अडचणींमुळं लोक त्रस्त असतात. त्यांना कुणीतरी अशा कथित बाबांचं नाव सांगतं. या कथित बाबांची एक यंत्रणा तयार असते. ती आपलेच काही लोक तयार करून बाबांमध्ये दैवी शक्ती कशी आहे, सर्व व्याधींवर त्यांच्याकडं कसे पभावी उपचार होतात, त्यांच्यामुळं किती लोकांचं भलं झालं, असं सांगून कथित बाबांचं चांगलंच मार्केटिंग करीत असतात. त्यातून अशा भोंदूबाबांनी श्रद्धांचा बाजार मांडला होता. लोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यातून शोषणाची एक नवी व्यवस्था उभी केली होती.
खरं तर आपली संत परंपरा फार मोठी आहे. त्यागावर आधारलेली ही परंपरा आहे. संत गाडगेबाबांसारख्यांनी तर स्वतः च दर्शन कुणालाही घेऊ दिलं नव्हतं. त्यांनी देवापेक्षा माणूस मोठा मानला. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणार्यांची संख्या कमी नाही; परंतु जनसेवेतून मेवा खाण्याची वृत्ती चांगलीच बळावली आहे. त्यातून अशा भोंदूबाबांच्या दुकानदारीला बळ मिळालं. धन, दौलत मृतिकासमान मानणारे, छत्रपती शिवाजी महारांजांनी पाठविलेला नजराणा नम्रपणे नाकारणारे संत एकीकडं आणि सध्याच्या राजकीय व्यवस्थेकडून लाखोंच्या, कोटींच्या देणग्या उकळणारे कथित संत दुसरीकडं. संतांची राहणी साधी असली पाहिजे. काही संत, माहात्म्ये अजूनही पोत्यावरच बसतात. कोणाच्याही रुपयाला हात लावत नाहीत. त्यांच्या शरीराला ऐषारामाची सवय नाही; परंतु अलीकडचे कथित संत लाखो रुपयांच्या ऐषारामात लोळतात. वातानुकुलित वाहनांतून फिरतात. सुक्या मेव्याशिवाय काही खात नाहीत. कथित शिष्यांकडून सेवा करवून घेतात. काहींचं वागणं तर लिंगपिसाटासारखं असतं. अलिकडच्या काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांची कृष्णकृत्यं बाहेर येत आहेत, ती पाहिली, तर हे संत आहेत, की संताच्या वेषातील दैत्य? आपल्या चांगल्या वाणीचा उपयोग शहाणं करून सोडावं सकळजनांना या साठी होण्याऐवजी महिलांच्या लैंगिक शोषणासाठी करण्यात काही जण धन्यता मानतात. अशा कथित संतांमुळं एकूणच धर्म आणि संतांची पतिमाही मलीन होते. अशा परिस्थितीत अखिल भारतीय आखाडा परिषदेनं जे धाडस दाखविलं, त्याचं स्वागत केलं पाहिजे.
गेल्या तीन-चार वर्षांत अशा कथित संतांमुळं एकूणच सार्या संतांविषयी नकारात्मक भावना वाढीस लागायला लागल्या होत्या. या कथित संतांची मजल इतक्या दूर गेली, की ते आपल्याविरोधात तक्रार करणार्यांना या जगातून उठवू लागले. काहींच्या विरोधात ज्यांनी तक्रार करण्याचं धाडस केलं, त्या फिर्यादीला धमकावलं जाऊ लागलं. आसारामबापूंच्या पकरणात तर साक्षीदारांचे मृत्यू झाले. हे मृत्यू गूढ आहेत. बलात्कार पकरणात तुरुंगात असलेल्या आसारामबापूंची पुस्तकं नाशिकमधील शाळांतून वितरीत केली जात होती. राजस्थान सरकारनं तर तिसरीच्या पुस्तकात थोर माहात्म्याच्या यादीत आसारामबापूंचा उल्लेख केला होता. ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल होते, अशा राम रहीमला हरयाणा सरकारमधील मंंत्री 51 लाखांची देणगी देत होते. कोटयवधींचा व्यवहार असूनही त्यांच्याकडं कधीच पाप्तिकर खात्याची नजर गेली नाही. न्यायालयानं शिक्षा सुनावल्यावरही कथित मुलीला बरोबर राहू दिलं नाही, म्हणून राम रहीम मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचं नाव घेऊन तुरुंगाधिकार्यांना बदली करण्याची धमकी देतो. राजाश्रय मिळाल्यानं आपलं कुणीच काही करू शकत नाही, हा जो उद्दामपणा येतो, तो न्यायालयानं घालविण्यापेक्षा सामान्यांनीच घालवायला हवा. भारतीय राज्यघटनेपेक्षा अशा धार्मिक दलालांनी निर्माण केलेली स्वतंत्र व्यवस्था जास्त पभावी ठरू देणं धोक्याचं आहे. आसाराम बापू असोत, की राम रहीम; त्यांनी कायदा वाकविण्याचा पयत्न केला. राम रहीमच्या समथर्कांनी तर बाबांना दोषी धरल्यानंतर हरयाणा, पंजाबच्या कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिलं. राम रहीमच्या एकामागून एक बाहेर येणार्या सुरस कथा पाहिल्या, तर यांना संत म्हणण्यापेक्षा देशद्रोही म्हणायला हवं. त्यांच्या आश्रमात स्फोटकांचा कारखाना कशासाठी काढण्यात आला होता आणि इतक्या दिवस आपल्या गुप्तचर यंत्रणाही काय करीत होत्या, या पश्नांची उत्तरं शोधावी लागतील. असे कथित बाबा हा समाजाला आणि धर्मालाही कलंक आहे. गेल्या काही वर्षांत देशाच्या वेगवेगळ्या भागातील या कथित संतांना खून, बलात्काराच्या आरोपावरून आत जावं लागलं. काहींना शिक्षा झाली. काहींना ती होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेच्या महंतांनी 14 भोंदूबाबांना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेऊन योग्य पाऊल उचललं आहे. सामान्यांची दिशाभूल आणि साधू महंतांची बदनामी टाळण्यासाठी हा निर्णय आवश्यक होताच. उत्तर पदेशातील अलाहाबाद येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली.
या बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचं आवाहन परिषदेकडून नागरिकांना करण्यात आलं. आखाडा परिषदेनं जाहीर केलेल्या 14 भोंदूबाबांच्या यादीत बाबा गुरमीत राम रहीम, आसाराम ऊर्फ आशुमल शिरमानी, आसारामचा मुलगा नारायण साई, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजीत सिंह, सचिदानंत गिरी ऊर्फ सचिन दत्ता, ओम बाबा ऊर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, स्वामी आसिमानंद ऊर्फ ओम नमः शिवाय, बाबा खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी या कथित बाबा-महाराजांचा समावेश आहे. बाबा राम रहीमवरील बलात्काराचा गुन्ह्याचा दोषारोप सिद्ध होऊन त्याची रवानगी तुरुंगात झाल्यानं हिंदू धर्माच्या धमर्गुरूंची सर्वोच्च संस्था असणार्या अखिल भारतीय आखाडा परिषदेला हे पाऊल उचलावं लागलं आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेनं आता संत ही उपाधी देण्यासाठी एक पक्रिया निश्चित करण्याचा ठराव केला आहे. यापुढं कोणाही व्यक्तीची पडताळणी करून त्याची छाननी केल्यानंतरच ही उपाधी पदान करण्यात येईल. संत व्यक्तीजवळ कुठल्याही स्वरूपाची रोख रक्कम अथवा त्याच्या नावावर कुठलीही संपत्ती असता कामा नये. अशी संपत्ती किंवा रोख रक्कम ही ट्रस्टच्या नावानं असायला हवी. तसेच याचा मोठा भाग हा लोकांच्या कल्याणासाठी वापरला जायला हवा. लोकांनी कुणाचं अनुयायी बनण्यापूर्वी त्यांची विश्वसनीयता पडताळून पाहणं आवश्यक आहे. उत्तर पदेशातील वेगवेगळे आखाडे वेगवेगळ्या पदव्या देतात. त्यात काही आखाडे महामंडलेश्वरसह काही पदव्यांचा कसा बाजार मांडतात, याबाबत मागं आरोप-पत्यारोप झाले होते. खरं तर त्यातही आता पारदर्शकता आणायला हवी.