Breaking News

राजीव कुमार यांनी स्विकारला नीती आयोग उपाध्यक्षपदाचा कार्यभार

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - प्रसिद्ध अर्थतज्ञ राजीव कुमार यांनी आज नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढीया  यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. पनगढीया यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अमेरिकेत अध्यापनाचे  काम करण्याचा निर्णय घेतला .
राजीव कुमार यांनी आशियाई विकास बँक, अर्थ मंत्रालय व उद्योग मंत्रालयात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी-फिल व  लखनौ विद्यापीठातून पीएच. डी. केली आहे.