Breaking News

केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार ; खातेपालटही होणार ?

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे . या बाबतच्या वृत्ताला केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून दुजोरा देण्यात  आला आहे. मंत्रिमंडळात ज्यांचा समावेश केला जाईल त्यांची नावे रविवारी सकाळीच जाहीर होतील , असे भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील  मंत्रिमंडळाचा हा तिसरा विस्तार असणार आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील 3 जागा रिक्त आहेत . मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री झाल्याने संरक्षण मंत्रीपद  सोडले . तर वेंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी नगर विकास मंत्रीपदाचा राजीनामा दिला . पर्यावरण मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणारे अनिल  दवे यांचे अलीकडेच निधन झाले.