Breaking News

इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. 06, सप्टेंबर - भारताच्या पुढील वर्षीच्या इंग्लंड दौर्‍याचं वेळापत्रक निश्‍चित झालं आहे. या दौर्‍यात भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि  पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. या दौर्‍याची सुरूवात पुढील वर्षी 3 जुलैला होणार्‍या टी-20 सामन्यांपासून होईल.  त्यानंतर 12 ते 17 जुलै या कालावधीत वन डे सामने खेळवण्यात येतील. 1 ऑगस्ट ते 11  सप्टेंबर 2018 या दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका पार  पडेल.