Breaking News

नितीन आगे खून प्रकरणातील 2 फरार आरोपींना अटक

अहमदनगर, दि. 21, सप्टेंबर - जामखेड तालुक्यातील खर्डा येथे 2014 साली झालेल्या व संपूर्ण राज्यभर गाजलेल्या नितीन राजू आगे या युवकाच्या खून प्रकरणी  फरार असलेल्या 2 आरोपींना भिंगार पोलीसांनी नगर शहरातील चांदणी चौकात अटक केली.विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने जामीन रद्द झार दोघेही फरारच  होते.दजोघांनाही जामखेड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संदीप तुकाराम शिकारे(वय 27) व विनोद अभिमन्यू गटकळ(वय 27,दोघे राहाणार खर्डा,तालुका जामखेड)अशी पोलीसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.  2014 साली जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रेमप्रकरणा तून 17 वर्षे वयाच्या नितीन राजू आगे याला शाळेतूनच पळवून नेऊन त्याचा खून करण्यात आला होता.  या प्रकरणी पोलीसांनी एकूण 12 जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला होता. आरोपींना पोलीसांनी अटक देखील केली होती. आरोपीं पैकी संदीप शिकारे व विनोद  गटकळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोघांचा जामीन नंतर रद्द केला होता. मात्र उच्च न्यायालयात  जामीन रद्द झाल्यानंतर मागील एक वर्षापासून दोघेही फरार होते. दरम्यान संदीप शिकारे व विनोद गटकळ हे दोघे फरार आरोपी नगर शहरातील चांदणी चौकात  आले असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार भिंगार पोलीसांनी तातडीने दोघांना अटक करून जामखेड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.दरम्यान  नितीन आगे हत्या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलेली असून एकूण 24 साक्षीदारांची तपासणी व उलट तपासणी पूर्ण झालेली आहे.या प्रकरणातील  फिर्यादी व नितीन आगे याचे वडील राजू आगे, वैद्यकीय अधिकारी व सरकारी पंच वगळता शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आदि बहुतेक पंच फितुर झाले आहेत.