खंडणी मागितल्याप्रकरणी दाऊदचे आणखी दोन साथीदार ताब्यात

ठाणे, दि. 26, सप्टेंबर -  बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी दोन साथीदार ठाणे गुन्हे  अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे.
गेल्या आठवड्यातच ठाणे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरसह तिघांना अटक केली होती. खंडणी  विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्याकडून कासरकसह अन्य जणांची कसून चौकशी सुरू आहे. त्यातूनच अधिक माहिती मिळत असून पुढील कारवाई केली जात  आहे.