रत्नागिरीतून अनोखी गांधी विचार यात्रा सुरू
रत्नागिरी, दि. 26, सप्टेंबर - येथून आज अनोखी गांधी विचार यात्रा सुरू झाली. येत्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी या यात्रेचा समारोप सेवाग्राम आश्रमात (जि. वर्धा) होणार आहे.
गांधींच्या विचाराने रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील बापू शेठ या तरुणाला जणू झपाटले आहे. गांधीजींचे अहिंसेचे विचार घेऊन तो संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. गांधी हत्येचे प्रायश्चित्तदेखील त्याने घेतले आहे. गांधी विचार घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी रत्नागिरी ते सेवाग्राम अशी महात्मा गांधी शांतता संदेश यात्रा सुरू केली आहे. रत्नागिरीतून या यात्रेला आज सुरुवात झाली. रत्नागिरी, देवरूख, साखरपा, मलकापूर, पुणे, नाशिक, वर्धा ते सेवाग्राम असा आठ दिवसांत एक हजार 200 किलोमीटरचा प्रवास तो करणार आहे. ही शांती संदेश यात्रा गांधी जयंतीला 2 ऑक्टोबर रोजी सेवाग्राम येथे पोहोचणार आहे. बापू शेठ आणि त्यांच्या सहकार्यांनी ही यात्रा आयोजित केली आहे. अशा पद्धतीची ही पहिलीच यात्रा आहे.

Post Comment