Breaking News

गैरवर्तणूक करणा-या प्रवाशांविरोधात नागरी उड्डाण मंत्रालयाची कडक नियमावली

नवी दिल्ली, दि. 09, सप्टेंबर - विमान प्रवास करणा-या प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रथमच नो फ्लाय सूची आज जारी  केली. विमानात गैरवर्तणूक करणा-या प्रवाशांवर कायदेशीर कारवाईसह संबंधितांवर आजीवन प्रवास बंदीची कारवाईही केली जाणार असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण  मंत्री अशोक गजपती राजू यांनी येथे दिली.
या नियमावलीत तीन स्तर असणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रवाशाला अर्वाच्च भाषेत बोलणा-या किंवा अयोग्य व्यवहार करणा-या प्रवाशावर तीन महिन्यांसाठी  प्रवासाची बंदी घातली जाईल. दुस-या टप्प्यात धक्काबुक्की, शारीरिक मारहाण करणा-या प्रवाशावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली जाईल. तिस-या टप्प्यात जीवे  मारण्याच्या धमकीसह अयोग्य वर्तन करणा-या प्रवाशावर कमीत कमी दोन वर्षांची व जास्तीत जास्त आजीवन विमान प्रवासावर बंदी घालण्याची तरतूद करण्यात  आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.
या बंदी विरोधात दाद देण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे आणि त्या पुढे न्यायालयातही आव्हान दिले जाऊ शकते, असेही सिन्हा यांनी सांगितले.