Breaking News

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला; जवान शहीद

पंथा चौक, दि. 02, सप्टेंबर - श्रीनगरमधील पंथा चौक भागात सुरक्षा दलाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका जवानाला आपला प्राण गमवावा लागला.  तर आठ जवान गंभीर जखमी झाले. शुक्रवारी हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जवानांना रूग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आले. त्यापैकी एकाचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तत्पूर्वी, आज संध्याकाळी 6.30च्या सुमारास पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यात सीमा सुरक्षा दलाचा एका सहाय्यक  उपनिरिक्षक शहीद झाल्याचे लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले.