Breaking News

हूसैनी इमारत दुर्घटनेबद्दल राज्यपालांनी केला शोक व्यक्त

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत दुर्घटनेबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शोक व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत अनेक  निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, याची अत्यंत दु:ख होत असल्याचे विद्यासागर राव म्हणाले.
दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मी आपल्या शोकसंवेदना कळवितो, तसेच जखमी झालेले नागरिकांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी मी  प्रार्थना करतो, असेही राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.