Breaking News

आधार व पॅनकार्ड संलग्न करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - आधार कार्ड व पॅन कार्ड एकमेकांशी संलग्न करण्यासाठी केंद्र सरकारने 31 डिसेंबरबर्यंत मुदतवाढ दिली आहे. दोन्ही क्रमांक  एकमेकांना संलग्न करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख होती. तिला सरकारने मुदतवाढ दिल्याने हजारो जणांना दिलासा मिळाला आहे.
उपरोक्त दोन्ही क्रमांक एकमेकांशी संलग्न करणे सरकारने अनिवार्य केले आहे. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द केले जाईल, आयकर विवरण पत्रही सादर करता येणार  नाही, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. सध्या आधार क्रमांक केवळ घरगुती गॅसवर अनुदान मिळणे, बँक खाते उघडणे, मोबाईलचे सिम घेणे  आदींसाठी प्रमाणित कागदपत्र आहे. आता आयकर विवरण पत्र सादर करण्यासाठीही अनिवार्य केले जात आहे. यासाठी पॅन कार्ड व आधार कार्ड ऑनलाईन,  एसएमएस व ऑफलाईन या पद्धतींनी संलग्न करता येणार आहे.