Breaking News

नोटा रद्द : 9 लाख 72 हजार खातेधारकांवर आयकर विभागाची करडी नजर

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - नोटा रद्द केल्यानंतर देशभरात 13 लाख 33 हजार बँक खात्यांतून एकूण 2.89 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले. ही रक्कम  जमा करणा-या 9 लाख 72 हजार व्यक्तींवर करडी नजर असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने बुधवारी 2016-17 या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला. नोव्हेंबर 2016 मध्ये जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. ही  रक्कम 15.44 लाख कोटी रुपये इतकी होती. त्यापैकी 15.28 लाख कोटी रुपयेच बँकांमध्ये जमा झाले. या पार्श्‍वभूमीवर आज आयकर विभागाने या संदर्भातील  माहिती दिली. अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण कमी करणे, डिजिटायझेशन, कर प्रमाण वाढवणे, काळ्या पैशाविरोधातील लढाई हे नोटा रद्द करण्यामागील प्रमुख  उद्देश होते. ज्यांनी रक्कम जमा केली त्या व्यक्तींचा तपशील संकलित करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.