Breaking News

म्हाडातर्फे मुंबईतील 819 सदनिकांची 10 नोव्हेंबरला सोडत

मुंबई, दि. 15, सप्टेंबर - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील  विविध वसाहतीतील 819 सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्‍चिम येथील रंगशारदा सभागृहात मंगळवार, दि. 10 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय  सोडत काढण्यात येणार आहे. सदर सोडतीकरिता जाहिरात शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये व म्हाडाच्या  https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष  लाखे यांनी दिली. पलि; 
सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच  संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. 16/09/2017 रोजी दुपारी 2 वाजेपासून दि. 21/10/2017 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत  अर्
नोंदीत माहितीमध्ये दिनांक 16/09/2017 रोजी दुपारी 2 ते दि. 22/10/2017 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बदल करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी  ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. 17/09/2017 रोजी दुपारी 2 ते दि. 22/10/2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. बँकेत डीडी  स्वीकृती दि. 17/09/2017 ते दि. 25/10/2017 या कालावधीत केली जाणार आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा  पर्याय देण्यात आला आहे. NEFT / RTGS द्वारे चलन निर्मिती दि. 17/09/2017 दुपारी 2 ते दि. 23/10/2017 रोजी रात्री 12 पर्यंत करता येणार आहे.  NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी दि. 17/09/2017 दुपारी 2 ते दि. 24/10/2017 रोजी रात्री 12 पर्यंत कालावधी असणार आहे.डेबिट कार्ड  / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम दि. 17/09/2017 रोजी दुपारी 2 ते दि. 24/10/2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.
यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता दि. 01/04/2016 ते  31/03/2017 या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. 25,000/ पर्यंत असावे. अल्प  उत्पन्न गटाकरिता रु. 25,001 ते रु. 50,000 पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. 50,001 ते रु. 75,000 पर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु.  75,001 वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क  (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. 15,336/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. 25,336 प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. 50,336  प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता रु. 75,336 प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज रु. 336 (विना परतावा) अर्ज शुल्काचा  समावेश आहे.
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प  उत्पन्न गटाकरिता कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्‍चिम), सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्‍चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील 192  सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्‍चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्‍चिम), चारकोप कांदिवली  (पश्‍चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण 281 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल - मुंबई, तुंगा - पवई,  चारकोप कांदिवली (पश्‍चिम), शिंपोली -कांदिवली (पश्‍चिम) येथील एकूण 338 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू  नये. तसे केल्यास मुंबई मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.