Breaking News

5 हजाराची लाच घेताना तलाठीला रंगेहात अटक

पुणे, दि. 27, सप्टेंबर - दौंड तलाठी कार्यालयातील तलाठी शरद मारुती लोंढे (वय-42) याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 हजाराची लाच घेताना  रंगेहाथ अटक केली. एका तक्रारदाराचे वारस/वाटप पत्र नोंदीची नोंद फेरफारला घेऊन सातबारासाठी तलाठी शरद लोंढे यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली  होती. या दरम्यान संबंधीत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार विभागाने सापळा रचून शरद लोंढे याला 5 हजाराची लाच  घेताना रंगेहाथ अटक केली.