Breaking News

कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात 449 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

मुंबई, दि. 13, सप्टेंबर - 24 जूनला राज्यातील शेतकर्‍यांच्या माफीची घोषणा करण्यात आली . पण त्यानंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं सत्र संपलेलं नाही.  तेव्हापासून आतापर्यंत राज्यात 449 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. या 449 आत्महत्यांमध्ये  विदर्भात सर्वाधिक 187, त्याखालोखाल मराठवाड्यात 156  शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात 77, पश्‍चिम महाराष्ट्रात 26, तर कोकणात 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी ते  ऑगस्टदरम्यान 1808 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हाच आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठा आहे. गेल्यावर्षी 1770 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या.  कर्जमाफीनंतर ही आत्महत्येचं सत्र सुरूच असलं तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची जबाबदारी मात्र सत्ताधारी भाजप शिवसेना आणि घटक पक्ष घ्यायला तयार नाहीत.  अगदी दोन्ही कृषीमंत्री आणि सत्तेतले शेतकरी नेतेही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. एकूणच कर्जमाफीच्या निर्णयानंतरही शेतकर्‍यांना अजिबात दिलासा मिळालेला  नाही. त्यात कर्जमाफीची लांबलेली  प्रक्रिया हा दुष्काळात तेरावा महिना ठरतोय.