Breaking News

सारसबा नवरात्रोत्सव समितीकडून 300 मुलींचे कन्यापूजन

पुणे, दि. 27, सप्टेंबर - पैठणीचा घोळ ग ... हिरव्या साडीला पिवळी किनार, आज मंगळवार देवीचा वार गं .....या महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा मातेच्या आळवणीने  पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी मंगळवारी दुपारी सारसबागेसमोरील महालक्ष्मीच्या मंदिराचा परिसर मंगलमय करुन टाकला. मुलींचा उत्साह पाहून  अभिनेत्रींनाही मुलींची शिकवणी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही कन्यापूजन उत्साहात साजरे केले.
महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे नवरात्रोत्सव निमित्त मंगळवारी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या संत शाळांमधील 300  मुलींच्या कन्यापूजनाचा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमनीस, ज्योत्स्ना म्हाळसे व अश्‍विनी कुलकर्णी यांच्या हस्ते या मुलींचे  धार्मिक व पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.