Breaking News

धर्म, जात, देव पाळणारे लोक मनोरुग्ण - श्रीपाल सबनीस

पुणे, दि. 27, सप्टेंबर - राजन खान यांच्या अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयातील फलकांना आणि हलाल चित्रपटाच्या पोस्टरला काळे फासल्याचा पुण्यात  घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. राजन खान हे सत्याचे नायक असून त्यांच्या कार्यालयात झालेला हल्ला नपुंसक प्रवृत्तीच्या लोकांनीच केला असू शकतो. अशा  शब्दात माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कट्टरतावाद्यावर तोफ डागली. यावेळी त्यांनी धर्म, जात आणि देव पाळणारे लोक मनोरुग्ण असल्याचा घणाघात  केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
तिहेरी तलाकवर भाष्य करणा-या हलाल या मराठी विरोध करणा-या अवामी विकास पार्टीच्या तरुणांनी राजन खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळे  फासले होते. राजन खान हे कार्यालयात हजर नसल्याने या तरुणांनी हलाल सिनेमाच्या पोस्टर्सवर काळी शाई ओतून काही पत्रके कार्यालयात ठेवून कार्यकर्ते निघून  गेले होते. त्या प्रवृत्तीचा समाचार घेताना ते बोलत होते.