Breaking News

एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 21 कोटींचा खर्च

सोलापूर, दि. 25, सप्टेंबर - केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रस्ते तयार करण्याच्या धोरणानुसार डॉ. आंबेडकर चौक ते रंगभवन चौकापर्यंत रस्ता तयार  करण्यात येणार आहे. तब्बल 21 कोटी रुपयांच्या 1 किलोमीटर रस्त्याला विरोध म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने मॉर्निंग वॉक आंदोलन करण्यात  आले.वास्तविक पाहता हा रस्ता व्यवस्थित असून या रस्त्यावर एकही खड्डा नसताना सुद्धा रस्ता तयार करण्याचा अट्टाहास केला जातो. याचा निषेध बहुजन समाज  पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करुण करण्यात आला. सध्या वापरात असणारे शहरातील सर्व रस्ते हे तब्बल 17 कोटींत पूर्ण झाले आहेत. मात्र अवघ्या 1  किलोमीटरच्या या रस्त्यासाठी 21 कोटी खर्च करायची आवश्यकता का पडली ? असा संतप्त सवाल बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आला.