Breaking News

आय. पी. एच. संस्था आयोजित द्विज पुरस्कार-2017 कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे, दि. 25, सप्टेंबर - आय.पी.एच. या संस्थेतर्फे रविवार 8 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंत नाट्यमंदिर, दादर येथे ॠद्विज  पुरस्कार-2017’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंभीर मानसिक आजारांचा सामना करून ज्यांनी आपली उभारी परत मिळवली आणि या  प्रवासामध्ये ज्या कुटुंबियांनी त्यांना साथ दिली अशा व्यक्तींच्या संघर्षाचा सन्मान म्हणजे द्विज पुरस्कार. मनोरुग्ण या शब्दाभोवती गैरसमजांचे जाळे आहे. आपण  अशा व्यक्तींना म्हणतो शुभार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांना म्हणतो शुभंकर.
संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 400 मनोविकारतज्ञांना संपर्प करून तसेच माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचून या शुभार्थी व शुभंकरांकडून अर्ज भरून घेतले जातात,  त्यांची छाननी होते आणि एकूण 6 जणांना हे पुरस्कार दिले जातात. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे औचित्य साधून दर एक वर्ष आड या सोहळ्याचे आयोजन  पेले जाते आणि सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे अनुभव सर्व समाजापर्यंत ठेवले जातात.
यावर्षी रविवार 8 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी ठिक 10-30 वाजता यशवंत नाट्यमंदिर, दादर येथे होणाऱया या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अनेक  नामांकित मनोविकारतज्ञ उपस्थित राहणार आहेत. इंडियन सायकीऍट्री सोसायटी या मानसोपचारतज्ञांच्या संस्थेचे येत्या वर्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित भिडे हे  बंगलोरहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील ज्येष्ठ तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. शुभांगी पाटकर, डॉ. आशिष देशपांडे, डॉ. हेनल शहा, डॉ. भरत  वाटवानी हे या सोहळ्यातील टॉक-शो मध्ये सहभागी होतील. तज्ञ आणि पुरस्कार विजेते यांच्यातील दुवा म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोविकासतज्ञ डॉ.  आनंद नाडकर्णी हे करतील. मनोविकार ते मनोविकास हे टॉक-शो मागचे सूत्र असेल.
हा कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क खुला आहे. या पुरस्कारांसाठी आर्थिक पाठबळ दिले आहे श्री. फाटक या शुभंकर कुटुंबाने तर सामाजिक बांधिलकीचा प्रकल्प म्हणून  पहिल्या वर्षीपासून या प्रकल्पाची सहकारी आहे युएसव्ही फार्मा ही औषध कंपनी. गेली 27 वर्षे मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत अशा ठाण्याच्या आय.पी.एच.  मानसिक आरोग्य संस्थेच्या या उपक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.