Breaking News

17 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अंबरनाथ येथे पोलिसाला अटक

ठाणे, दि. 25, सप्टेंबर - भंगारवाल्याकडून 17 हजार 500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या  अनिल पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.
पाटील यांनी अंबरनाथ पश्‍चिम भागातील बुवापाडा परिसरात भंगारचे दुकान सुरू करण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.  त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार केली होती. पाटील यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक  दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.