सांगली महापालिका स्थायी समिती सभापती निवड 13 सप्टेंबरला
सांगली, दि. 11, सप्टेंबर - सांगली महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी बुधवार दि. 13 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. पुणे विभागीय आयुक्त यांनी या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम पुणे विभागीय आयुक्त यांनी जाहीर केला आहे. त्यात मंगळवार दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. स्थायी समितीत सध्या महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नऊ, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच व स्वाभिमानी विकास आघाडीचे दोन सदस्य आहेत.
मात्र गत सभापती निवडीत बहुमत असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाला होता. काँग्रेसमध्ये ङ्गाटाङ्गूट होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती संगिता हारगे अनपेक्षितपणे सभापती झाल्या होत्या. हा पराभव काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे यंदा स्थायी समिती सदस्य निवडीपासूनच काँग्रेस नेत्यांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. काँग्रेसमध्ये सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यूहरचना करण्यास सुरूवात केली आहे.
काँग्रेसमधून श्रीमती रोहिणी पाटील, दिलीप पाटील, किशोर लाटणे व बसवेश्वर सातपुते यांनी स्थायी समिती सभापती पदावर जोरदार हक्क सांगितला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महेंद्र सावंत यांच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांना पुन्हा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. मिरज शहरातील काँग्रेसचे नगरसेवक अतहर नायकवडी यांच्यासह निर्णायक ठरणार्या काँग्रेसच्या बिगर विश्वासी मतांवर राष्ट्रवादी काँग्रेसने गळ टाकला आहे. याशिवाय स्वाभिमानी विकास आघाडीशीही संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.