Breaking News

ललित कोल्हे जळगावच्या महापौरपदी विराजमान

जळगाव, दि. 11, सप्टेंबर - जळगाव शहर महानगर पालिकेच्या 11 व्या महापौर पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ललित कोल्हे आज विराजमान झाले. पिठासन अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कोल्हे यांची मनपाच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
ललित कोल्हे यांना भारतीय जनता पक्षासह मनपातील सर्वच पक्षांनी पाठींबा दिल्याने त्यांची महापौर पदी बिनविरोध निवड झाली आहे. जळगाव महानगर पालिकेत खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. परंतु बहुमताचा आकडा पूर्ण नसल्यामुळे खाविआला सत्तेसाठी कधी राष्ट्रवादी तर कधी मनसेचा घ्यावा लागला आहे. गेल्या 4 वर्षात खाविआने राखी सोनवणे यांना पहिले अडीच वर्ष यांना महापौर पद दिले होते. यावेळी राष्ट्रवादीने खाविआला मदत केली होती. तर नंतच्या अडीच वर्षासाठी खाविआने मनसेला सत्तेत सहभागी करुन घेत पूर्ण पाठींबा मिळवला आणि नितीन लढ्ढा यांच्या रुपाने अभ्यासू नगरसेवक मनपाला लाभला होता. मात्र सत्तासमीकरणानुसार शेवटचे एक वर्ष मनसेला महापौरपद देण्याचा शब्द जेष्ट नेते माजी मंत्री सुरेश जैन यांनी दिलेला असल्याने 23 ऑगस्ट रोजी नितीन लढ्ढा यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज जळगावच्या विकासाचा गाडा ओढण्याची जबाबदारी तरुण तडफदार ललित कोल्हे यांच्या खांद्यावर आली आहे. ललित कोल्हे यांना सर्वच पक्षांनी पाठींबा दिल्याने त्यांची महापौर पदी बिनविरोध निवड झाली आहे.