Breaking News

सार्वजनिक गणेश मंडळातर्फे होतकरुंसाठी ‘वहीदान’ करण्याचे भाविकांना आवाहन

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून सातारा शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणपती मंडळाच्या ठिाकणी ’वहिदान पेटी’ ठेवण्यात येणार असून हे सर्व साहित्य पेटीत जमा करावे. प्रत्येक व्यकीने श्री गणेशाच्या चरणी हार, नारळ तर अर्पण कराच, पण त्याचबरोबर केवळ एक वही व एक पेन अर्पण करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सातारा तर्फे करण्यात आले आहे.
उत्सव बुद्धिदेवतेचा - विकास शिक्षणाचा हा उपक्रम गणेशोत्सव काळात राबविला जात आहे. यावर्षी तब्बल साठपेक्षाही जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत हा उपक्रम साकार होत आहे. आपणही यातील एक भाग म्हणून या उपक्रमात सहभाग होऊ शकता. सार्वजनिक मंडळाच्या दानपेटीत जमा झालेल्या सर्व शैक्षणिक वस्तू आम्ही गरजू गरीब शाळेमध्ये अथवा अनाथाश्रमातील गरजू मुलांना शैक्षणिक मदत म्हणून देणार आहे. यंदाच्या श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांकडून भक्ती, श्रद्धा याचबरोबर समाजकार्य देखील होणार आहे.
समाजातील प्रत्येक कमवत्या व्यक्तीने जर श्री गणरायाच्या चरणी 15 ते 20 रुपये किमती असलेल्या एक वही आणि पेन अर्पण केल्यास त्या अनाथश्रामामधील गरीब मुलांच्या शिक्षणाला हातभार लागेल. तसेच ज्या लोकांना सार्वजनिक मंडळांतील दान पेटीत साहित्य जमा करायचे नसतील तर त्यांनी रोटरी क्लब ऑफ सातार्‍याच्या प्रकल्प प्रमुख रोट्रॅक्ट आनंद सगरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.