विदयापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त पाच मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार
औरंगाबाद, दि. 21, ऑगस्ट - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पाच मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून ग्रंथप्रदर्शन, गुणवंताचा गौरव आदी कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पाच मान्यवरांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये भुजंगराव कुलकर्णी (प्रशासकीय सेवा), न्यायमूर्ती सी.एल.थूल (विधी), मुरलीधर शिंगोटे (पत्रकारिता), प्राचार्य डॉ.विश्वनाथ कराड (संशोधन), व डॉ.जगन्नाथ पाटील (शिक्षण) यांच्या समावेश आहे. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.23) सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या गुणवत्तापदक प्राप्त करणाछया विद्याथ्र्यांचा गौरव करण्यात येईल. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे व विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी केले आहे.
दुर्मिळ ग्रंथप्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञान स्रोत केंद्रात (ग्रंथालय) 21 व 22 ऑगस्ट रोजी दुर्मिळ ग्रंथप्रदर्शन व उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कुलसचिव डॉ. पी.व्ही. जब्दे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या ग्रंथप्रदर्शनात ज्ञान स्रोत केंद्रात जतन केलेले 1650 ते 1800 या कालखंडातील दुर्मिळ ग्रंथ, राजे शाम राजे यांचे हस्तलिखित ग्रंथ व इतर मौलिक ग्रंथ मांडण्यात येणार आहे. या ग्रंथप्रदर्शनात थोर व्यक्तींची चरित्रे / आत्मचरित्रे, संस्कारक्षम ग्रंथ, ख्यातनाम स्त्रियांचे ग्रंथ, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज, डॉ.अब्दुल कलाम यांच्यावरील ग्रंथ इत्यादी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार नियतकालिके आणि विद्यापीठातील प्राध्यापकांनी लिहिलेले ग्रंथ अशा निरनिराळ्या विषयावरील ग्रंथाचा समावेश या ग्रंथप्रदर्शनात असणार आहे. दुर्मिळ ग्रंथप्रदर्शन दोन दिवस सर्वांसाठी खुले राहणार असून सहभाग नोंदवावा असे आवाहन ग्रंथालयाचे संचालक डॉ.धर्मराज वीर यांनी केले आहे.