रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ‘कोस्टल एम्लॉयमेंट झोन’ तयार करा, निती आयोगाचा सल्ला
नवी दिल्ली, दि. 25, ऑगस्ट - देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी समुद्र किनारपट्टीवर ‘कोस्टल एम्लॉयमेंट झोन’ तयार करण्याचा सल्ला निती आयोगाने सरकारला दिला आहे. या झोनमध्ये दहा हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणा-या कंपन्यांना तीन वर्ष आणि वीस हजार नोक-यांची संधी देणा-या कंपन्यांना सहा वर्षापर्यंत वस्तू आणि सेवाकरामध्ये सवलत देण्यात यावी, या कंपन्यांना पाच वर्षापर्यंत कॉर्पोरेट करापासूनही सूट देण्यात यावीअसेही आयोगाने सुचवले आहे.
पुढील दोन-तीन वर्षामध्ये देशाच्या विकासाच्या दरात आठ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज निती आयोगाने वर्तविला आहे. आयोगाने देशाच्या विकासातील पुढील तीन वर्षांमधील कार्याचा अहवाल सादर केला. यात 2017-18 पासून 2019-20 या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेच्या वेगवगळ्या क्षेत्रांमध्ये, न्यायव्यवस्था, विनिमय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे आयोगाने म्हटले आहे.