Breaking News

रूमेश रत्नायके श्रीलंकेचे नवे मुख्य वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक

कोलंबो, 09 . ऑगस्ट - माजी वेगवान गोलंदाज रूमेश रत्नायके यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली  आहे. 53 वर्षीय रत्नायके हे देशातील प्रशिक्षण केंद्रातील वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याबरोबरच मंडळातील इतर वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकांच्या कामगिरीवर  लक्ष ठेवणार आहेत. मात्र, रत्नायके संघाबरोबर कोणत्याही दौ-यावर जाणार नाहीत.