Breaking News

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पुजारा तिस-या स्थानी

दुबई, 09 . ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फलंदाज चेतेश्‍वर पुजारा तिस-या स्थानी विराजमान झाला  आहे. श्रीलंकेविरूद्ध पहिल्या कसोटीत दीडशतकी (157) खेळी आणि दुस-या कसोटीत 133 धावांची खेळी करत पुजाराने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी  केली आहे. दुस-या कसोटीत शतकी खेळी (132) करणा-या अजिंक्य रहाणेला 6 स्थानांची बढती मिळून तो 11व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.  याशिवाय, गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी 20व्या स्थानी तर उमेश यादव 22व्या स्थानी पोहोचला आहे.