Breaking News

‘चीन ओपन’मधील थेट प्रवेशाच्या ‘ऑफर’ला शारापोवाचा होकार

बीजिंग, 09 . ऑगस्ट - चीन खुल्या टेनिस स्पर्धेतील थेट प्रवेशाच्या ‘ऑफर’चा रशियाच्या स्टार टेनिसपटू मारिया शारापोवाने स्वीकार केला आहे. सोमवारी  आयोजकांनी तिला थेट प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या स्पर्धेत ती सातव्यांदा सहभागी होणार आहे. या आधी 2014साली तिने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले  होते तर 2012मध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मांडीच्या दुखापतीमुळे शारापोवाला यंदाच्या विम्बल्डन व इतर मैदानी कोर्टवरच्या स्पर्धांना  मुकावे लागले होते.