Breaking News

भाजप हा गरिबांचा पक्ष- गर्जे

पाथर्डी़, दि. 26, ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाचे संतुलन रहावे व गरिबांच्या झोपडीत गॅस पोहचावा, यासाठी उज्वला गॅस योजनेची सुरुवात केली  आहे. आतापर्यंत लाखों गरीब महिलांनी या योजनेचा भाग घेतला असून भाजप हा गरिबांचा पक्ष असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी कृतीतून दाखवून दिले आहे, असे  प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी केले.
शहरातील शेवंगाव रोडवरील भगवान गॅस एजन्सीमध्ये पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थी महिलांना गॅस वाटपाचा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता. यावली ते बोल्ट होते. अध्यक्षस्थानी औरंगाबाद विभागाचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे प्रमुख सुजित रॉय हे होते. यावेळी जेमॉस्को सोनम, केतन  कार्तिक, शेवगाव येथील वितरक नितीन भुसारी, संजय सुर्वे, मुकुंद गर्जे आदी यावेळी उपस्थित होते. कंपनीचे अधिकारी सुजित रॉय यांनी गॅस वापरतांना घ्यावयाची  काळजी व सुरक्षा याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद गर्जे यांनी तर आभार संजय सुर्वे यांनी मानले.