Breaking News

पाथर्डीत श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना डीजे आणि गुलाल वापराला फाटा

पाथर्डी़, दि. 26, ऑगस्ट -समाधानकारक पावसामुळे शहर व तालुक्यात गणेशोत्सव उत्साहात सुरु झाला. यामध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी चित्ररथाच्या  सहाय्याने सादर केलेला देखावा आणि सुवर्णयुग तरुण मंडळाची मिरववणूक उत्सवाचे मुख्य आर्कषण ठरले. सायंकाळनंतर प्रमुख मंडळानी मिरवणूका काढल्या. विशेष  म्हणजे पाथर्डी शहरात डीजे व गुलाल बंदीची मोठया प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली. 
तहसिलदार नामदेव पाटील, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे आदींच्या हस्ते सुवर्णयुग तरुण मंडळाच्या गणपतीचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंडळाचे अध्यक्ष  वैभव शेवाळे, विश्‍वस्त मुकुंद लोहिया, महेश बाहेती आदी पदाधिकार्‍यांनी सादर केलेली स्वच्छ भारत अभियानाची नाटिका पाहण्यास चौकाचौकात मोठी गर्दी जमली.  नगरच्या सावरा ग्रुपतर्फ अष्टविनायक दर्शनाची नृत्य नाटिका तर शाहिर दिलीप शिंदे व भारत डमाळे या कलाकारांनी सादर केलेले प्रबोधन व विविध उपक्रमांची  माहिती देणारे पोवाडे लक्षवेधी ठरले. तहसीलदार पाटील यांनी पदाधिकारी आणि गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
सुवर्णयुग परिवार, नवोदय, जय भवानी, गणेश पेठ, जय बजरंग, कसबा विभाग, विश्‍वकर्मा, जगदंब युवा प्रतिष्ठाण, क्रांतीदल संघटना आदी मंडळांनी सायंकाळी उशिरा  वाजतगाजत गणरायाची स्थापना केली. शहरातून जड वाहतूक बंद करण्यात आली. तालुक्यातील तिसगाव, करंजी, टाकळीमानूर, अकोला, कोरडगाव, खरवंडी  कासार, माणिकदौंडी, भालगाव, मिरी, चिचोंडी आदी ठिकाणी गणरायाची  उत्साहात स्थापना करण्यात आली.