Breaking News

बिहारच्या पारदर्शकतेचा बुरखा फाटला!

दि. 22, ऑगस्ट - बिहार या राज्यामध्ये काही दिवसांपूर्वीच राजकीय उलथापालथी नंतर संपूर्ण देशाचे लक्ष बिहारवर केंद्रित झाले होते. बिहारचे विद्यमान  मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांचे चिरंजीव तेजस्वी कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे व्यथित होत राष्ट्रीय जनता  दलाची साथ सोडत भाजपासोबत घरोबा केला होता. हा घरोबा करतांना नितीशकुमार यांनी पारदर्शक सरकारचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा  भ्रष्टाचारमुक्त बिहार, पारदर्शक सरकारचा दावा फोल ठरला, फसवा, ठरल्याचे सृजन घोटाळयामधून स्पष्ट होत आहे. नितीशकुमार देखील मॉर्केटिंग  करण्यात माहीर आहेत. प्रसिध्दीचा झोत कायम आपल्याकडे ठेवण्यात ते नेहमीच यशस्वी होत असले, तरी आता भ्रष्टाचाराचे आरोप नितीशकुमार यांची पाठ  सोडणार नसल्याचे दिसून येत आहे. बिहारमध्ये सृजन या स्वयंसेवी संघटनाकडे सरकारी निधीतील कितीतरी कोटी रूपये, हस्तांतरण करण्यात आले  आहेत. ज्याचा शोध लेखापरीक्षण करतांना समोर आल्यामुळे या प्रकरणांला वाचा फुटली असून, नितीशकुमार यांचा पारदर्शक सरकारचा बुरखा फाटला  आहे. बिहारच्या मुख्यमंत्री नितीशकुमार 2010 पासून विराजमान आहेत. यामधील कालावधीत काही महिन्यांचा अपवाद वगळता नितीशकुमार मागील  15-17 वर्षांपासून बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. भागलपूरच्या संजीत कुमार यांनी 2013 मध्ये सृजन महिला सहयोग समितीच्या घोटाळयासंबधी  नितीशकुमार यांच्याकडे  तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे 2013 साली नितीशकुमार यांनी बिहारच्या राज्यातील सर्व तक्रारी मुख्यमंत्री या नात्याने  कोणत्याही विभागाकडे न जाता आपल्याकडे येण्याचा घाट घातला होता. असे असतांना 2013 मध्ये या घोटाळयासंबधी नितीशकुमारांना माहित असतांना  देखील त्यांनी या घोटाळयाची चौकशी न करता, उलट या घोटाळयाला अभयच दिल्याचे स्पष्ट होत आहे. या घोटाळयाची कडी म्हणजे, यासंबधीत आरोपी,  नाजिर महेश मंडल यांची तुरूंगात झालेला संशयास्पद मृत्यू. नाजिर मंडल यांचे जनता दल युनायटेडशी असलेले कनेक्कशन समोर आले आहे. नितीशकुमार  देखील जनता दल युनायटेड या पक्षांशी संबधित असल्यामुळे, हा घोटाळा नितीशकुमार यांच्या आणि त्यांच्या पक्षांसी संबधित व्यक्तींकडेच बोट दाखवतो.
बिहारचे राजकारण नेहमीच भ्रष्टाचाराभोवती फिरत असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. मात्र दरम्यानच्या काळात नितीशकुमार यांनी आपली प्रतिमा जपत  आपल्या चारित्र्यावर कोणताही डाग नाही, आपण स्वच्छ प्रतिमेचे भासवत, त्यांनी बिहारच्या राजकारणासह राष्ट्रीय राजकारणांवर आपली छाप सोडली. मात्र  सृजन घोटाळा उघडकीस असलस. जो तब्बल 750 कोटींचा घोटाळा आहे. ज्यात सरकारी खात्यातील पैसेच या सृजन स्वयंसेवी संघटनेच्या खात्यात जमा  होत होते. हे प्रकरण गंभीर असून, यात राजकारण्यांसह, वरिष्ठ अधिकार्‍यांचा देखील समावेश असण्याची शंका आहे. त्यामुळे आता नितीशकुमार यांच्या  प्रतिमेवर शिंतोडे न उडल्यास नवल वाटायला नको. नितीशकुमार यांच्या कारकीर्दीतील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार यानिमित्ताने समोर येण्याची शक्यता आहे.  नितीशकुमार यांनी भाजपाची  वाट धरल्यामुळे, त्यांना या प्रकरणी केंद्रातून अभय मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मध्यप्रदेशातील व्यापंम  घोटाळयाप्रमाणेच या घोटाळयाची गच्ंछती न होवो. ही अपेक्षा. मात्र याप्रकरणीनितीशकुमार यांचे बिहारच्या राजकारणातील प्रमुख विरोधक लालुप्रसाद यादव  सृजन घोटाळयाप्रकरणी शांत बसणार नाही. बिहारच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडी पाहता, सृजन घोटाळादेखील बिहारच्या राजकारणात नाटयमय  घडामोडी घडवून आणू शकतो, हे नक्की.