स्वाइन फ्लूचा संसर्ग; आरोग्य विभागाने केले काळजी घेण्याचे आवाहन
पुणे, दि. 01, ऑगस्ट - स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूने 27 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.देशात गेल्या सात महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू पुणे आणि परिसरात झाले असल्याची माहिती यापूर्वी आरोग्य विभागाने दिली होती. ताप, थंडी, डोकेदुखी, उलट्या अशी स्वाइन फ्लूची ठळक लक्षणे दिसताच पहिल्या दोन दिवसांमध्ये टॅमिफ्ल्यू हे औषध देण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे डॉक्टरांना करण्यात आले आहे. तापाची इतर औषधे देऊनही रुग्णाला बरे वाटत नसल्यास तातडीने स्वाइन फ्लूची औषधे द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.