Breaking News

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 2500 पदे रिक्त, कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा भार

पुणे, दि. 01, ऑगस्ट - पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील शासन मंजूर 9 हजार 754 पदांपैकी 2 हजार 581 पदे रिक्त आहेत. यामुळे सर्वच विभागात  अधिकारी व कर्मचार्‍यांची वानवा आहे. मात्र, रिक्त पदांमुळे सध्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण येऊ लागला आहे. याकडे महापालिका  आयुक्तांसह प्रशासन विभागाचे अधिकारी कानाडोळा करू लागले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील 6 हजार 699 छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायिक कंपन्यांमुळे ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात आलेल्या नागरिकांनी वास्तव्य केले.  यामुळे शहराच्या लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यावेळी नगरपालिका असलेल्या पिंपरी चिंचवड शहर 1981 मधील जनगणनेनुसार 2 लाख 49 हजार  364 एवढी लोकसंख्या झाली होती. या लोकसंख्येच्या आधारावर 11 ऑक्टोबर 1982 रोजी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले.  त्यानुसार महापालिकेत गट अ-85, गट ब-208, गट क-2987 तर गट ड-4181अशा एकूण 7 हजार 461 एवढे अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे डिसेंबर 2015  अखेर कार्यरत होते. मात्र महापालिकेत सामाविष्ट 18 गावाचा समावेशाने महापालिकेचे क्षेत्रफळ प्रचंड वाढले. आता महापालिकेचे क्षेत्रफळ 177.3 चौरस किलो मीटर  एवढे झालेले आहे. तर मिळकतींची संख्याही 4 लाख 7 हजार 910 एवढी झालेली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रफळ व कामांचा ताण अधिकारी व कर्मचार्‍यांवर येवू  लागला आहे. तरीही महापालिकेत सरळसेवेने कर्मचारी भरती झालेली नाही.