Breaking News

पवना धरणातून 1404 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

पुणे, दि. 01, ऑगस्ट - पवना धरणात 8.202 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असून धरण 96.35 % टक्के भरले आहे. आज सकाळी सहा  वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार हैड्रोगेट द्वारे 1404.11 क्युसेक्सने पाणी नदीत सोडण्यात येत आहे.मागील काही दिवसांपासून संपूर्ण मावळ आणि पवना धरणक्षेत्रात  चांगला पाऊस होत आहे. परिणामी पवना धरणात जवळपास 100 टक्के पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. काल, सोमवारी दिवसभरात 6 मिमी पावसाची नोंद  झाली तर एक जूनपासून आजपर्यंत 2292 मिमी पाऊस झाला आहे.