Breaking News

जपानच्या शिष्टमंडळासोबत पर्यटन मंत्र्यांनी दिली धोबी घाटाला भेट

मुंबई, दि. 29, ऑगस्ट - महाराष्ट्र दौर्‍यावर आलेल्या जपानच्या शिष्टमंडळासोबत पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी आज महालक्ष्मी स्थानकाजवळील  धोबी घाट येथे भेट दिली. प्रत्यक्ष धोबी घाटात जावून पर्यटनमंत्री श्री. रावल यांनी धोबी घाटच्या कामकाजाची माहिती शिष्टमंडळाला दिली.
महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना मिळावी या पार्श्‍वभूमीवर जपानमधील वाकायामा राज्याचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात आले आहे. या शिष्टमंडळाने आज सुरूवातीला  पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यानंतर दुपारच्या सुमारास या शिष्टमंडळासोबत श्री. रावल यांनी धोबी घाटमध्ये प्रत्यक्ष जावून पाहणी  केली. जपानच्या शिष्टमंडळाला त्यांनी धोबी घाटाच्या कामाचे नियोजन समजावून सांगितले. महाराष्ट्रात पर्यटन विकासाच्या दृष्टीने जपानसोबत विविध सामंजस्य करार  करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिली. शिष्टमंडळात ओनीशी तात्सुनोरी, काझुओ यामासाकी, मसाकी शिमीझु, इतारु ताकाहाशी, हिडेकाझु  हिराई, श्रीमती चिनात्सु साकामोटो, युमी नाकामोटो, ताईको मिनामी यांचा समावेश होता.