Breaking News

गणेशोत्सवात वृक्ष दत्तक घेण्याचे आवाहन

लातूर, दि. 29, ऑगस्ट - गणेश चतुर्थी निमित्त लातूर वृक्ष या चळवळीअंतर्गत अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांना वृक्ष दत्तक घेऊन संवर्धनाचे आवाहन करण्यात  आले होते. त्याला प्रतिसाद देत यश अँकँडमी च्या 250 विद्यार्थ्यांनी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून वृक्ष संगोपन करण्यासाठी पुढाकार घेतला. खेळाच्या गुणांप्रमाणेच  वृक्ष संवर्धनासाठीही वाढीव गुण द्यावेत अशी मागणी करण्यात आली. दैनंदिन जीवनात उपयोगी लिंबू, कढीपाला व विविध फुलांच्या झाडांचे विद्यार्थ्यांनी संगोपन  करण्याची जबाबदारी घेतली. विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपन प्रतिज्ञा देण्यात आली. प्रत्येक मुलाला वृक्षासोबत राष्ट्रीय महापुरुषांचे चरित्र पुस्तक देण्यात आले. यात 250  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना खेळाचे वाढीव गुण प्रोत्साहनपर दिले जातात. त्याप्रमाणे वृक्ष संगोपनाचेही गुण द्यावेत अशी मागणी यावेळी लातूर वृक्षतर्फे करण्यात आली. या विषयी  शिक्षणमंत्री विनोद तावडे, जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना पत्र देण्याचे ठरले. हा अनोखा उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला म्हणून यश अँकँडमीच्या  संचालिका पल्लवी कुलकर्णी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी लातूर वृक्षचे डॉ अभय कदम, सुपर्ण जगताप, इम्रान सय्यद, क्रीडा अधिकारी जयराज मुंढे, यश  कुलकर्णी, कृष्णकुमार बांगड उपस्थित होते.