Breaking News

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एक पोलीस शहीद

जम्मू, दि. 26, ऑगस्ट - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलीस शहीद झाला. या चकमकीत  पोलीस दलातील दोन आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोन जवान जखमी झाले आहेत. चकमक अद्यापही सुरू असून दहशतवाद्यांच्या गोळीबाराला पोलीस  चोख प्रत्यूत्तर देत आहे.
दहशतवाद्यांनी पहाटे 4.30 च्या सुमारास पोलीस ठाण्यावर गोळीबार केला. या भागात दोन ते तीन दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी  सुरक्षा दलाची तुकडी रवाना झाली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोध मोहिम सुरू केली आहे. सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात इंटरनेट सेवा  स्थगित करण्यात आली आहे.