Breaking News

शाळकरी चुलत भावांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

औरंगाबाद, दि. 01, ऑगस्ट - कन्नड शहरातील चुलतभाऊ असलेल्या दोन शाळकरी मुलांचा शहराजवळील हिवरखेडा गौताळा येथील पाझर तलावात बुडून मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली. सागर दिलीप सुरे (वय 13, रा. हिवरखेडा रोड, कन्नड) व विशाल विजय सुरे (वय 14, रा. वडारवाडा,  कन्नड), अशी त्यांची नावे आहेत. कन्नड शहरातील रहिवासी असलेले सागर दिलीप सुरे व विशाल विजय सुरे हे साने गुरुजी विद्यालयात इयत्ता नववीचे विद्यार्थी होते.  हिवरखेडा गौताळा जवळील राम मंदिराच्या पाठीमागे पाझर तलाव आहे. या पाझर तलावालगत या दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांची शेती आहे. हे विद्यार्थी रविवारची  सुटी असल्याने नेहमीप्रमाणे शेतात केले होते. ते अंघोळीसाठी तलावात उतरले होते. त्यावेळी त्यांचा तलावात बडून मृत्यू झाला. मुले बुडाल्याचे समजल्यानंतर  हल्लकल्लोळ झाला. पालक व शेजारच्या नागरिकांनी तलावकडे धाव घेऊन त्यांचा मृतदेह बाहेर काढला. या मुलांना कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी  आणले असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद कन्नड शहर पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.