Breaking News

प्रातःविधी साठी घराबाहेर गेलेल्या बालिकेवर बलात्कार

बीड, दि. 26, ऑगस्ट - प्रातःविधी साठी घराबाहेर गेलेल्या पंधरा वर्षाच्या बालिकेस अडवून तिच्यावर लैंगिक अत्त्याचार करून पसार झालेल्या युवकास ताबततोब  शोधून अटक करा या मागणीसाठी आज एका गटाने आज गेवराई पोलिस ठाण्यासमोर अंदोलन केले.
आज सकाळी गेवराई जवळील बागपिंपळगावं कॅम्प येथे राहणारी मुलगी प्रातःविधी साठी घराबाहर गेली होती रणातून परतत असताना उसाच्या फडातून विकास मदन  देवकते (20 ) हा युवक बाहेर आला त्याने वाईट हेतूने तिला फडात बोलावले तिने नकार देताच तिला बळजबरीने शेतात नेवून तिच्यावर बलात्कार केला.  तिच्यासोबत फोटोही काढला. घरी गेल्यानंतर झालेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर आईने मुलीला घेवून पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल  झाला असला तरी आरोपी फरार असून आरोपीला अटक करा या मागणीसाठी संतप्त जमावाने पोलिस ठाण्यासमोर धरणे धरली आहेत.