Breaking News

पंजाबात हिंसाचार झालेला नाही; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा खुलासा

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदा चे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पंजाबात हिंसाचार झालेला नाही , असा खुलासा  पंजाबचे मुख्यमंत्री कॅ . अमरिंदर सिंग यांनी  येथे बोलताना केला. 
ते म्हणाले की , पंजाबमध्ये पूर्ण शांतता असून आमच्या राज्यात हिंसाचारामुळे एकही बळी गेलेला नाही . पोलिसांना गोळीबार , लाठीमार करण्याची वेळ आलेली  नाही . हिंसाचार होऊ नये या साठी आमच्या यंत्रणेने आवश्यक ते उपाय योजले आहेत. यावेळी त्यांनी हरयाणा सरकारवर टीका केली . एवढ्या मोठ्या संख्येने  लोक येत असताना निकालाची प्रतिक्रिया उमटणार हे अपेक्षितच होते , असे ते म्हणाले.