Breaking News

लष्करात ट्रान्सजेंडरच्या नियुक्तीचा ओबामांचा निर्णय ट्रम्प रद्द करणार

वॉशिंग्टन, दि. 27, ऑगस्ट - लष्करात तृतीयपंथीयांच्या नियुक्तीला परवानगी देणारा मागील सरकारचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प रद्द करण्याच्या तयारीत  आहेत. पेंटागनला देण्यात आलेल्या याबाबतच्या आदेशावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून स्वाक्षरी करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांकडून मात्र या  निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. हा निर्णय क्रूर असून त्याने जवानांचा अपमान होणार असल्याचे डेमोक्रॅटिक नेत्यांनी म्हटले आहे. व्हाइट हाऊसकडून  काढण्यात आलेल्या पत्रात संरक्षण मंत्री, गृह सुरक्षा मंत्री यांना जून 2016 पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रान्सजेंडर नागरिकांना लष्करात सेवा देण्याची परवानगी देऊन संरक्षण विभागाच्या रचनेला धक्का पोहोचवला, असा आरोप ट्रम्प  प्रशासनाने काढलेल्या आदेशात करण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी 2018 पर्यंत हे प्रतिबंध लागू करण्यात यावेत असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.