Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

औरंगाबाद, दि. 08, ऑगस्ट - गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत आरोपीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. लहु कडाजी नाटकर (33, रा. जालना) असे या  आरोपीचे नाव आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून दोघांची चांगली मैत्री आहे. तीन वर्षांपासून पुंडलिकनगर भागातील एका भाड्याच्या घरात राहतात. दरम्यान,  आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ती पाच महिन्यांची गर्भवती राहिली. यानंतर तिने आरोपीकडे लग्नाचा सारखा तगादा  लावला होता. मात्र आरोपीने वेळ मारून नेत लग्नास स्पष्ट नकार दिला. यापुढे लग्नाचा विषय काढला तर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रियकराने  आपला विश्‍वासघात करून आपल्यावर सतत अत्याचार केला असल्याची तक्रार पीडिने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर आरोपी मात्र पसार झाला. पुढील  तपास सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड करत आहेत.