Breaking News

ठेवीदारांच्या विश्‍वासामुळे नोटबंदीनंतरही शारदा पतसंस्थेची ऐतिहासिक कामगिरी - मालपाणी

संगमनेर दि. 09 (प्रतिनिधी) :- नोटबंदीनंतर देशभरातील सहकारी बंँका व पतसंस्थांसमोर अनेक आव्हाने उभी राहीली. मात्र सभासद व ठेवीदारांनी संस्थेवरील  आपला विश्‍वास अधिक दृढ करीत शतकीय ठेवींचा आकडा पार केला. एकीकडे आर्थिक मंदीत पतसंस्थांना कामकाज करणे अवघड होऊन बसलेले असतांना,  दुसरीकडे शारदा पतसंस्थेने 103 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा गाठुन ऐतिहासिक कामगिरी केल्याचे प्रतिपादन चेअरमन गिरीश मालपाणी यांनी केला. शारदा नागरी  सहकारी पतसंस्थेच्या 25 व्या वार्षिक सर्वसधारण सभेत ते बोलत होते. 
उद्योगपती राजेश मालपाणी यांनी रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेने किमान खर्च करुन अधिक नफा मिळवणे ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मोठ्या भावाच्या  नात्याने संगमनेर मर्चन्टस् बँकेने सभासदांचे हित लक्षात ठेऊन गेल्या आर्थिक वर्षात भरीव काम केले. छोट्या बहिणीच्या रुपातील शारदा पतसंस्थेनेही हाच कित्ता  गिरवतांना सभासदांना केंद्रस्थानी ठेऊन विविध सेवा-सुविधा देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यमान चेअरमन मनिष मनियार यांनी पुढील आर्थिक वर्षातील कामकाजाची दिशा निश्‍चित करतांना दरवर्षी शारदोत्सवाचे आयोजन करण्याचा मनोदय व्यक्त केला.  संस्थेचे संस्थापक सदस्य स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांच्या स्मृतीदिनी शारदा परिवाराचे स्नेहमिलन व्हावे, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचे कौतुक व्हावे असा एखादा  कार्यक्रम दरवर्षी घेण्याची योजना असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. संस्थेचे व्यवस्थापक माधव भोर यांनी सभेचे इतिवृत्त वाचले. राजेश लाहोटी यांनी आभार  मानले.
उद्योजक मनिष मालपाणी, प्रकाश राठी, अशोक भुतडा, डॉ.जगदिश भुतडा, गणेशलाल बाहेती, विनोद बुब, अनिष मनियार, सुवर्णा मालपाणी आदींनी मनोगत व्यक्त  करतांना संस्थेच्या पारदर्शी व प्रगतीच्या दिशेने सुरु असलेल्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन राजेश लाहोटी, विद्यमान  व्हा.चेअरमन कैलास राठी, विजमकुमार पलोड, सुरेंद्रकुमार कासट, उमेश झंवर, राजकुमार पोफळे, राजेश रा. मालपाणी, सागर वाकचौरे, सोमनाथ कानकाटे, संकेत  कलंत्री, जगदिश टोकसे, प्रतिमा चांडक, सोनाली नावंदर, विशाल पडताणी, अमर झंवर, डॉ. योगेश भुतडा आदी संचालकांसह संस्थेचे सभासद,  हितचिंतक व  कर्मचारीवृंद उपस्थित होते.