Breaking News

श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे भाविकांंची गर्दी

महाबळेश्‍वर, दि. 09 (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी श्रावणी सोमवारनिमित्त श्री  महाबळेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांना स्वयंस्फुर्तीने प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. महाबळेश्‍वरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  येथील भाविकांच्या दर्शनाच्या व्यवस्थेचे  नियोजन केले आहे. 
श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे भगवान श्री ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे वास्तव्य आहे, असे भाविक भक्तांंचा समज आहे. येथील शिवलिंग हे त्रिगुणात्मक असून भक्तांंची  मनोकामना पूर्ण करणारे एक अत्यंत रमणीय व पवित्र तिर्थस्थान आहे. सध्या येथे श्रावण महिना व कन्यागत महापर्वकाळ सुरु असल्याने भाविकांची मोठी गर्दी होत  आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगण राज्यातील भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत.  वन व्यवस्थापन समितीने भक्तांसाठी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न  केले आहेत.