Breaking News

संगमनेर तालुक्यातील शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित

संगमनेर दि. 09 (प्रतिनिधी) :- संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूरसह आश्‍वी परिसरातील शेतकर्‍यांना कर्ज माफीचा ऑनलाईन फार्म भरत असताना सरकारच्या  किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मनस्ताप सहन करवा लागत असल्याने हि परिस्थिती सर्व तालुक्यात असल्याने भाजपा  सरकारने पुकारलेल्या महत्वकांक्षी कर्जमाफी योजनेपासून किती शेतकर्‍यांना वंचित रहावे लागेल, सांगता येत नाही.
कर्जमाफी ऑनलाईन अर्ज भरत असताना उंबरी-बाळापूरसह आश्‍वी परिसरातील ज्या शेतकर्‍यांच्या आधारकार्डवर अहमदनगर (अहरारवपरसरी) असे नाव आहे. त्या  शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज स्विकारले जात आहे. तर अहमद नगर (अहरारव छरसरी) असे नाव असलेल्या शेतकर्‍यांचा ऑनलाईन अर्ज नाकारला जात आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी सरकारच्या या किचकट ऑनलाईन प्रक्रियेचा सामना करताना सरकारकडून आपली क्रुर चेष्टा चालवल्याचा अनुभव येत आहे.  उंबरी-बाळापूर, आश्‍वी बुद्रुक, आश्‍वी खुर्द, शिबलापूर आदी सर्व तालुक्यात गावांमध्ये आधारकार्ड काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या कँम्पमधील कर्मचार्‍यांकडून  नावामध्ये मोठ्या प्रमाणात चूका झाल्या आहेत. त्याचा फटका मात्र आज येथील सर्वसामान्य कर्जबाजारी शेतकर्‍यांना बसत असून कर्जमाफीपासून वंचित राहण्याची  वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.
दरम्यान प्रशासकीय अधिकार्‍यांनी या घटनांची दखल घेत शेतकर्‍यांची अडचण सरकारच्या लक्षात आणून देत, यावर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून  करण्यात येत आहे. पिक विमा योजनेचेही असेच तीन तेरा वाजल्याने या योजनेपासूनही लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत. मुबलक 5 दिवसांची मुदत वाढवून  तालुक्यातील सर्वच महा-ई सेवा कार्यालये सरर्वरमुळे बंदच होते. तर बँकांनीही मुदत संपल्यामुळे शेतकर्‍यांचे पीक विमा योजनेचे कोणतेच अर्ज मुदतीत असतांनाही  स्विकारले नाही. तर कृषी विभागातील अधिकार्‍यांनाच पिक विमा कोठे भरायचा हे सांगणे कठीण झाले होते. पिक विमा योजनेचेही मुदत वाढवून वंचित राहिलेल्या  शेतकर्‍यांचे अर्ज ऑफलाईन स्विकारून त्यासाठी तालुका व गावनिहाय केंद्र सुरू करावे, अशी मागणी देखील सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे. एकूणच   सरकराच्या या जाटक अटी व किचकट प्रक्रिया साध्या व सोप्या पध्दतीत करण्यात याव्यात, जेणेकरून कोणी वंचित राहणार नाही.