Breaking News

आ. डॉ. सुधीर तांबे आणि सौ. दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना

संगमनेर, दि. 26, ऑगस्ट - आ. डॉ. सुधीर तांबे आणि सौ. दुर्गाताई तांबे यांनी आज तांबे हॉस्पिटल संगमनेर येथे गणेशाची प्रतिष्ठापना केली. मूर्तिकार गोकुळ  उपाध्ये यांनी बनविलेला हा सुबक व आकर्षक गणेश. भाविक भक्तांचे दुःख दूर करून त्यांना आरोग्य प्रदान करो असे साकडे यावेळी तांबे दाम्पत्याने भगवान  गणेशाला घातले. डॉ. तांबे यांनी आज शहरातील विविध गणेश मंडळांनाही भेटी दिल्या. यावेळी ढोल वाजवत मोठ्या उत्साहाने गणरायाचे स्वागतही करण्यात आले.