Breaking News

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक महाजन यांच्यावर खुनी हल्ला

सोलापूर, दि. 16, ऑगस्ट - श्री  रुक्मिणी  समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यावर रविवारी रात्री खुनी हल्ला झाल्याची घटना घडली. हल्लेखोराने  मोटार सायकलने प्रथम धडक दिली व त्यानंतर खुनी हल्ला केला. ही घटना स्टेशन रोडवरील पॉप्युलर हॉटेलजवळ घडली.
विलास महाजन हे रविवारी रात्री आपले काम संपवून घरी निघाले होते. त्यावेळी भरधाव वेगाने मोटार सायकलने महाजन  दुचाकीला पाठिमागून  दिली.  दुचाकीचा तोल गेल्याने खाली पडलेल्या महाजन यांना हल्लेखोराने जबर मारहाण केली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या महाजन यांच्यावर हल्लेखोराने दगड घेऊन खुनी  हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महाजन यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.
महाजन यांनी घडलेली सर्व आपबिती पोलिसांना सांगितली. दरम्यान ही घटना समजताच मंदिर  कार्यकारी अधिकारी संजय  हे पोलीस ठाण्यात पोहोचले.  त्यानंतर महाजन यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाजन यांच्यावर उपचार सुरू आहेत. शासकीय अधिकार्‍यावर खुनी हल्ला झाल्याचे  समजताच पंढपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारपर्यंत यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नव्हती.
जखमी अवस्थेतच महाजन यांनी पोलीस ठाण्यात धाव  यामुळेच त्यांचा जीव थोडक्यात  चर्चा सुरू आहे. मंदिरात भाविक सोडण्याच्या कारणावरून हा  महाजनांवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.